🌷 घन-व्याकुळ सांज गेली…


🌷 घन-व्याकुळ सांज गेली…
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

धगधगती अशी दुपार
कशीबशी सरता-सरली...

हा वारा अबोल मुका
रेंगाळुनी सांज गेली...

झिरझिरते तराणे
गात-गात सांज गेली...

गहिवरल्या आभाळी
रंग खेळत सांज गेली...

लाजुन उखाण्यातूनी
सुचवून सांज गेली...

वळणावरी जरासे
वळण घेत सांज गेली...

हृदयातले बहाणे
लेऊनच सांज गेली...

पापणीत ओली माया
दाटून सांज गेली...

वचने देताना स्मरली
हळवी होत सांज गेली...

क्षितीजात विलीन होऊन
घन-व्याकुळ सांज गेली...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!