Welcome to my poetry blog

I use this space to Catalogue the poems written by me.

Hope you enjoy them.

I am Tilottama Lele a poetry enthusiast.

By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.

Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.

Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.


🌷 इच्छित फल-प्राप्ती…

🌷 इच्छित फल-प्राप्ती... 
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

थोर ऋषी " कात्य " यांनी घोर तप केले,
दुर्गा-मातेला "पुत्री-रुपात," मागुन घेतले…
वरदान म्हणून जन्म घेतला प्रसन्न देवीने,
कात्याऋषींनी "कात्यायनी" हे नाव दिले…

आजच्या नवरात्रीच्या सहाव्या शुभदिनी,
पूजन-अर्चनाची उत्सव-मूर्ती, कात्यायनी...
शांत-रूप, चार भुजा, त्रिनेत्रा, वरदायिनी...
शोभिवंत-सोनपरी-कांती-सुंदर त्रिभुवनी...

महिषासुर राक्षसाचे अतोनात अत्याचार...
तिन्ही लोकी माजलेला नुस्ता हां-हांकार...
विजयादशमीचा अतिशय शुभ होता वार...
क्रूर-मुजोर दैत्यास देवीने जीवे मारले ठार...

ही देवी मनो-सामर्थ्य, मनो-धैर्य वाढविते…
त्यामुळेच "मन-शक्ति"असेही नाव पडले...
रुक्मिणीने कात्यायनीलाच होते पुजिले,
देवी-कृपा-प्रसादे तिला श्रीकृष्ण मिळाले...

मनोभावे जो कात्यायनी-मातेला पूजेल,
त्यास धर्म-अर्थ-काम-मोक्ष सर्वच लाभेल...
कात्यायनी सत्य-धर्म-न्याय-निष्ठा पाळते,
भक्तांच्या वांच्छित मनोरथांची पूर्ती करते...

रोग-शोक-संताप-सूड-भयापासूनी मुक्ति...
भूलोकी अदभूत सुदैवाची होऊन प्राप्ती,
लाभती सगळी सुखे, नाम-कीर्ती-श्रीमंती...
साधना केल्याने होते इच्छित फल-प्राप्ती...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Poems by language


लेखनाचे प्रकार

भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस

सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी

दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत

You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.

Contact form



Poems by category

error: Content is protected !!