🌷वळीवाचा पाऊस…

वळीवाचा पाऊस...

🌷वळीवाचा पाऊस...
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

कधीतरी दु:ख असते पांगळे,
घळ-चळ गालांवरुन ओघळे…
वृक्ष-वेलींची घनदाट सावली,
तरी जीवाची अशी काहिली…

मेघावलींनी आभाळ दाटले…
तळपत्या सूर्यालाही अडवले
खट्याळ किरणे अंग काढून…
सुमडीतच तिथून गेली निघून…

तरळली सांज जरा-जराशी…
त्या शब्दांच्या क्षितीजापाशी…
अन् काळोख वितळत गेला,
वळीवाचा पाऊस कोसळला...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!