Welcome to my poetry blog

I use this space to Catalogue the poems written by me.

Hope you enjoy them.

I am Tilottama Lele a poetry enthusiast.

By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.

Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.

Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.


कविता – 🌷 ” विश्व-निर्माती “

कविता - 🌷 " विश्व-निर्माती “
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च।
दधाना हस्तपद्माभ्यां कूष्मांडा शुभदास्तु मे ।।

दुर्गा-देवी जेव्हा संपूर्णतः झाली तेजांकीत,
तिच्या सुहास्य-वदने, विश्व झाले निर्मित !
त्याआधी पूर्ण-जग बुडलेलं, घोर अंधारात
म्हणून ’विश्वनिर्माती-आदिशक्ति’ म्हणतात

आदिशक्तिच्या, अद्वितीय प्रखर तेजामुळं
होई-दुष्टांचा अंत-नष्ट-पापांची पाळंमुळं
कष्ट-संकटे दूर होती-संपून क्लेश समूळं
भक्तांचे संरक्षण-पुण्य-कर्म घडती सकंळं

आठ करांमुळे कूष्मांडा देवी "अष्टभुजा "
अत्यंत उष्म-सूर्य-लोकी, निवास देवीचा
सगळ्या ग्रहांना हेवा वाटे तिच्या तेजाचा
होई मान-सन्मान, दिव्य-स्वरूप-मातेचा

देवीची सुवर्ण-कांती तेजाने झळाळणारी
सु-हास्यातून बिजली-समान तळपणारी
देवीची आभा, सूर्यासम प्रकाश फेकणारी
स्वत:, अंडाकृती-ब्रह्मांड निर्माण करणारी

जर भक्तिपूर्ण-भावनेसह तिची पूजा केली
लाभेल प्रकृती-स्वास्थ्य-आयु-नाम-किर्ती
शक्तिचा-ज्ञानाचा-उगम, अज्ञानाची क्षिति
म्हणूनही-योगी "कूष्मांडा-स्वरूपा" पूजती

देवीच्या कृपेमुळे मनामधील मळभ नष्ट होते
प्रकाशमान-अंतर्मनी-निराशा पार जळून जाते
सूक्ष्म-ब्रह्मान्डात अंतर-बाह्य समतोल आणते
माणसाला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सोडविते ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏 🕉🔆
  • 🌷 मनाच्या सात-कप्प्यात…

    मनाच्या सात-कप्प्यात डोकावून पाहिलं…अन् सातही दरवाजांना बंद करुन टाकलं…पक्का बंदोबस्त म्हणून कुलूपसुध्दा लावलं…तरी हळुच निसटून गेला गतस्मृतींचा सुगंध…मनाच्या अथांग अकल्पनीय दालनात आला…सर्व बंधने झुगारून हृदयी विराजमान झाला…

    Read more: 🌷 मनाच्या सात-कप्प्यात…
  • 🌷 सार्थकी लागले…

    ते हलक्या पावलांनी येणे, डोळे झाकून खुदकन हसणे, दुडू-दुडू धावतच कुशीत बिलगणे…हवे-हवेसे वाटले…त्या लबाड, हस-या नेत्रांना बघणे…झेप घेत कवेत येणे, हवे-हवेसे वाटले…त्या दुधाळ-मधुर-गोब-या गाली…वात्सल्याने संपूर्ण विश्वच व्यापले…

    Read more: 🌷 सार्थकी लागले…
  • 🌷 “This Too Shall Pass”…

    Our life is full of ups n downs…Der R smiles, tears, laughters n frowns…Whatever d situation may be, it’ll surpass…Need to remember, “This Too Shall Pass”

    Read more: 🌷 “This Too Shall Pass”…
  • 🌷 One Day At A Time…

    D hospital, Prison n D cemetery…They say we need to visit these places…Then only we’ll know d Life’s nuances…Life doesn’t last as long as we like…Life is short, we need…

    Read more: 🌷 One Day At A Time…
  • 🌷 Witnessing Life…

    We spend so much of life, just trying to make each moment mean something…Life doesn’t ask us to understand it…Sometimes it asks to stay n witness it…

    Read more: 🌷 Witnessing Life…
  • 🌷 एक एहसास…

    हर जीव में, कण-कण में…परमात्मा का अंश मिलें है…अपनी अपनी जगह हरेक जीवन महत्व-पूर्ण होता है…सांस लेते हैं, सांस छोड़ते हैं…हमारे बस में कुछ भी नहीं है…जब नियंत्रण खोया सांस…

    Read more: 🌷 एक एहसास…

Poems by language


लेखनाचे प्रकार

भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस

सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी

दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत

You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.

Contact form



Poems by category

error: Content is protected !!