Welcome to my poetry blog

I use this space to Catalogue the poems written by me.

Hope you enjoy them.

I am Tilottama Lele a poetry enthusiast.

By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.

Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.

Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.


कविता – 🌷 ” त्रिदेव-त्रिमूर्ती ” 


कविता - 🌷 " त्रिदेव-त्रिमूर्ती "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले 

मार्गशीर्ष महिना महत्वाचा व आनंदाचा 
पौर्णिमेच्या शुभ-दिनी जन्म दत्तात्रेयांचा 
अनुसूया व अत्री ऋषींच्या या, सुपुत्राचा 
बाल-स्वरूपात जन्म घेणाऱ्या त्रिदेवांचा 

ब्रह्मा-विष्णू-महेश यांचा विशेष अवतार 
एकूण २४  गुरुंचे शिष्यत्व, ज्ञानार्जनास
प्रत्येकाकडून विशेष" ज्ञान "ग्रहण केले
संपूर्ण चरा- चरात ऐच्छिक भ्रमण केले

सजीव-निर्जीव दरेक वस्तू व वास्तुमध्ये,
स्थित, एकच" आत्म-तत्व" हे सिद्ध केले
औदुुंबराच्या छायेत शांत मोहक त्रिमूर्ती
कामधेनू-व-चार श्वान-त्यांच्या सभोवती

श्रीदत्तगुरु भक्तांचे मनोगत पूर्ण करतात 
जे मनोभावे पूजतात, त्यांना ते पावतात
गाणगापूरास उमटली दत्तात्रेयांची पाऊले
ज्ञान-प्रसारासाठी, अवधूत-रुपात-प्रकटले

पिठापूर, माहूर, गिरनार, कारंजा,कुरवपूर
गरुडेश्वर, औदुंबर, माणगाव व गाणगापूर
नृसिंहवाडी, अक्कलकोट, माणिक, नगर
ही क्षेत्रं त्यांच्या वास्तव्यामुळे परम-पवित्र

ज्या ज्या परिसरात, त्यांच्या झाला संचार
सुप्रसिद्ध पवित्र-तीर्थस्थानं झाली साकार
झाडून सगळे भाविक-भक्त-जन दर्शनास,
आतुरतेने गोळा होऊन, धन्य-धन्य होतात

ते रूप बदलून, भक्तांना अवधूत स्वरुपात 
विविध रितीने, भाग्यवंतांना "दर्शन" देतात
अनुग्रह करून-सगळी मनोरथे पूर्ण करतात
न मागता,"कल्पनातीत-दिव्य-काही-देतात"

🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉️🔆

Poems by language


लेखनाचे प्रकार

भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस

सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी

दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत

You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.

Contact form



Poems by category

error: Content is protected !!