Welcome to my poetry blog

I use this space to Catalogue the poems written by me.

Hope you enjoy them.

I am Tilottama Lele a poetry enthusiast.

By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.

Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.

Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.


कविता : 🌷” सम्भवामि युगे युगे “


कविता :🌷 " सम्भवामि युगे युगे "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

"यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥"
"परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥"

आजच्या शुभ दिवसाचं आहे अनन्यसाधारण असंच महत्त्व
वैशाख मास शुद्ध तृतीया, तिथी आहे "अक्षय-आणि-अनंत "
अर्थात् कधीही नाश न पावणारी अशी संपदा म्हणून अक्षय,
या शुभ दिनी त्रेतायुग-प्रारंभ झाला होता, हाच खरा आशय

जेव्हा सज्जनांचा छळ-अन्यायादी करुन दुष्ट अधर्मी माजतात,
भगवत् गीतेतील श्लोकानुसार ईश्वर अवतार घेऊन प्रकटतात
धर्म:पतन थांबवून सुजनांची रक्षा करण्या, श्रीविष्णु प्रकटतात
युगे-युगे जन्म घेऊन दुष्ट-दानव-दैत्यांचा समूळ विनाश करतात

ईश्वर जसे अवतार घेतात, कलियुगात राक्षस रुपं धारण करतात
लाच-लुचपत-अन्याय-शोषण-दारु-अफू-व्यसनादी रुपांनी येतात
अधम वृत्तींचा समूळ नि:प्पात करुन, शांति प्रस्थापित करण्यास,
सुधर्म पुन:स्थापित करण्यास भूवरी पुनःपुन्हा भगवंत अवतरतात

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Poems by language


लेखनाचे प्रकार

भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस

सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी

दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत

You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.

Contact form



Poems by category

error: Content is protected !!