
🌷 ज्ञानाचा-प्रचंड-खजिना...
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
माणसाला, "माणूस" बनवणं,
कर्मकठीण आहे साध्य करणं…
पुस्तकं करतील चुटकी-सरशी
वाचन-आवड, लागता जराशी…
पुस्तकां सारखा सखा-सोबती
ढूंडाळूनही न मिळे, या जगती…
संपूर्ण जन्मभराची साथसंगत
यथा-योग्य निभावतात पुस्तकं…
"गमभन" पासून पदवी-प्राप्ती
पुस्तकांची अति-प्रचंड व्याप्ती…
ज्याला पुस्तक-वाचनात गोडी
त्याची व ज्ञानाची जमते जोडी…
विचारांची प्रगल्भता, वाचनाने
बुद्धिस चालना उंच-भरारी-घेणें…
पुस्तकांसम मित्र अत्यंत दुर्मिळ
त्याच्या आनंदाला न पडे खीळ…
वाचन-संस्कार होतो बाल-वयात
मग तो वृद्धिंगत होतो तह-हयात…
वयाची-काळाची नाही परि-सीमा
वाचनानेच होतसे ज्ञानाची गर्जना…
जसे अन्न आवश्यक पोषणासाठी
पुस्तके आवश्यक ज्ञानार्जनासाठी…
झाडांमुळे तयार कागद अन् पुस्तकं
त्यातील ज्ञानाने तल्लख होई मस्तक…
गीता, महाभारत, रामायणादी रचना
कालातीत-ज्ञानाचा हा प्रचंड खजिना…
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆















