
🌷घन दाटला दाटला...
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
घन दाटला दाटला...
सूर ही बेपत्ता झाला...
अडकले शब्द कंठात,
भाव डोळ्यात थिजला...
घन दाटला दाटला...
वादळ-वारा ही सुटला...
शीडे फडकली भरारा,
लाटांनी भडीमार केला...
घन दाटला दाटला...
भाव-स्वर बदलला...
पापण्या जड होता,
काळोख दाटून आला
घन दाटला दाटला...
अन् वारा ही मंदावला...
अशा धुंद वातावरणी,
रातराणीला बहर आला...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆















