Welcome to my poetry blog

I use this space to Catalogue the poems written by me.

Hope you enjoy them.

I am Tilottama Lele a poetry enthusiast.

By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.

Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.

Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.


कविता -🌷 ” माणूस नावाचं बेट ” तारिख – ९ नोव्हेंबर २०१६

कविता -🌷 ” माणूस नावाचं बेट “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – ९ नोव्हेंबर २०१६
माणूस नावाचं बेट …
आहे अगदी मुंबा-पुरीसारखं …
पाणी चहू दिशांना,
पण पिण्या-योग्य पाण्याचा …
सदा-अन-कदा अभाव …
जणू माणसांचा महा-प्रचंड पूर,
पण सद्-जनां चा अभाव …
माणूस नावाच्या बेटावर
रेतीच्या कणागणिक,
माणसच माणसं …
अगणित…
अनंत …
चहू-बाजूंनी वेढलेल्या,
अथांग सागरा-समान …
जिकडे-तिकडे,
माणसच माणसं …
माणसांना नाही तोटा …
पण माणुसकीचा मात्र अभाव …
तुटवडा …
माणूस नावाच्या बेटावर …
माणूस म्हणजे एक-कोडं …
सुटेल- सुटेल असं वाटतं …
पण उलगडत नाही …
उकलंत नाही …
का ते उमंजत नाही …
माणसं वाचण्याचा छंद चांगला …
वाचता- वाचता अवघे आयुष्य,
केव्हा सरेल …
पत्ताच लागणार नाही …
पण पानं मात्र अनंत …
कधीच संपणार नाहीत…
माणूस नावाच्या बेटावर,
माणूस म्हणजे भला-मोठा हिम-नगं …
पाण्यावर अलगद तरंगणारा …
जेव्हडा डोळ्यांना दिसतो,
त्याच्या कैक-पटीनं
पाण्याखाली
गुपचूप दडलेला …
असं हे माणूस नावाचं बेट …
निसर्गाचा एक अचाट व अफाट नमुना …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Poems by language


लेखनाचे प्रकार

भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस

सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी

दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत

You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.

Contact form



Poems by category

error: Content is protected !!