कविता : गझल🌷”डोहात रात्र व्याली”


कविता : गझल🌷" डोहात रात्र व्याली "
कवयित्री:तिलोत्तमा विजय लेले

आताच सुगंधांची लयलूट आज झाली...
उत्कट, आतूर धरणी चिंब-चिंब भिजली...

निरभ्र आकाशी, रिमझिम बरसात झाली...
व्याकुळ, सुप्त आशा अलगद सत्य झाली...

न ध्यानी, मनी न स्वप्नी, डोहात रात्र व्याली...
सळसळत्या लहरींनी धरा चिंबचिंब न्हाली...

लुकलुकणा-या तारकांनी नजरा-नजर केली...
चंद्राळलेल्या आसमंतात रातराणी दरवळली...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!