
कविता : 🌷 " नयनांच्या कोंदणी "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
नयनांच्या कोंदणी एक स्वप्न थिजलेले
रोज न चुकता हाजरी लावण्या टपलेले…
निरभ्रशा निळ्या-निळ्या नभाची निळाई
डोळे भरभरून पीत, तृप्तीमधे पहुडलेले…
शांत निवांत डोहातील अथांग जलाशयात
चराचरातील सौंदर्यही प्रतिबिंबित झालेले…
ऋतुराजाच्या येण्याने पान-पान डवरलेले
कळ्या-फुलांच्या गंधाने मन झुळुक डोले…
चंद्राच्या प्रकाशात तन-मन फितूर झालेले
चांदण्यांच्या छत्रछायेखाली जीव वेडे-खुळे…
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply