
कविता : 🌷 " हृदयाची भाषा "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
अथांग निळाई मनामध्ये भरली...
बघता बघता नसोनसी भिनली
भुर्र पाखरे घरट्याकडे धावली...
चोची उघड्या, पिले भुकेजली...
तांबूस कोवळी पालवी फुटली...
हिरव्या रंगाची मोहिनी झाली...
शितल, सुगंधित झुळुक आली...
सुखद शिरशिरी अंगी उमटली...
तळहाती मेंदीने रंगविल्या रेषा...
सुखाच्या अबोल अनवट वाटा...
विरुन जाता पुसटशा सीमारेषा...
अनामिक हुरहुर हृदयाची भाषा...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply