कविता : 🌷 "हा भास, स्वप्न की सत्य असे"
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
भल्या पहाटे, डोळे उघडण्या पूर्वी
मखमली सूर फुंकर मारुनी ऊठवी...
मिटल्या डोळी, उठती तरल लहरी
सर्वांगी सरसरे, गोड अशी शिरशिरी...
ही कसली उठली आहे ऊर्मी मनांतरी...
विलक्षण असली तरी वाटे हवीहवीशी...
मनामध्ये तृप्ती, मग का कान अधाशी...
फिरफिरूनी सूर रुंजी घालिती मनाशी...
दुरून मधुर वेणूचा नाद भुरळ घालीतसे
मन राधा बनूनी, जणू त्याचकडे धावतसे...
सूर-वेडी राधा, त्या अमूर्ताला शोधत बसे...
अंतरीं तिच्याच तो अगम्य-स्वर लपला असे...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply