
कविता : 🌷 " मन वेडे "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
मन वेडे आशेचे पंख लेवून,
गगनी मस्त विहरू लागते…
सुरेखसे मनसुबे रचू लागते…
थेट निसर्गाच्या सहवासात,
आकंठ डूंबायला आसुसते…
मनातले मांडे मनात चाखते…
काल्पनिक जगातील सुगंध,
नसानसात भिनलेला जो दंभ…
तटतटा तुटती, पाशाचे निर्बंध…
मुक्त होण्यासाठी चिरंतन धडपड,
प्रयत्नांची शर्थ हवी विना बडबड…
गरूड-झेपेने जिंकायचा आहे गड…
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply