कविता:🌷”पहाट लाजली”


कविता : 🌷 " पहाट लाजली "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

घनदाट धुक्यातूनी धुंदल्या...
जलधारा पानांवर नटल्या...

दवबिंदूंच्या लकलकणा-या
त्यावर चंद्राळलेल्या नजरा...

स्वप्नातील चांदण्यात शोधे...
त्या गालांवरच्या खळ्यांना...

अन् सत्यात भानावर येता,
आळवीत बसे, सप्तसुरांना...

अचानक पाऊस कोसळून...
आठवांचे थेंब अलगद टिपून...

जणूकाही तृप्त धरा गंधाळली...
येता शुक्रतारा, पहाट लाजली...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!