कविता:🌷”चंद्राच्या साक्षीने”


कविता : 🌷 " चंद्राच्या साक्षीने "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

गगनात आज रात्री,
दिवाळी होईल साजरी
करूनी कोजागिरी,
हर्ष आनंदातच सारी...

शांतपणे वाट बघत
हसतमुखाने चांदवा,
संगे तारकांचा ताटवा
हळुच सुखद गारवा...

रोजच्याच दुधाला,
येई वेगळीच माधुरी,
आप्त स्वकीयां-समवेत
आली आज कोजागिरी...

करुनी नृत्य-गायन-वादन,
कोजागिरीला अभिवादन
आज चंद्राच्या साक्षीने
ओवाळून टाकूया जीवन...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!