तारिख – ३० नोव्हेंबर २०१६
कविता – 🌷 ” दिव्य-बंधन ”
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
बर्याचदा अगदी अनोळखी-अनामिक अशी व्यक्ती,
जलप्रवाहातील ओंडक्यासमान अकारण टक्करती …
प्रसंगी, निरपेक्ष भावनेने मदतीचा हात देऊन जाती …
निस्वार्थी परोपकारी भावनेनं सदैव उपयोगी पडती …
उपकाराची परत-फेड करण्यास, एकही संधी न देती …
जराही अवडंबर न माजवता, मूक-मार्गदर्शन करती …
व्यावहारिक नात्यांच्या कोणत्याही ढोबळ परिभाषेत…
वस्तुतः न बसणाऱ्या अशा महान विलक्षण व्यक्तीस,
विधात्याचा-दूत म्हणावं की त्याचा तरल सूक्ष्म-संदेश …
या जगीं सर्वजण एकाच अदृष्य-अगम्य-सूत्रानं बंधीत …
“ब्रह्म-तत्व” हे एकमेव दिव्य-बंधन असे प्रत्येक व्यक्तीत…
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply