🌷 पितरांचे शुभाशिर्वचन...
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
ॐ पितृ गणाय विद्महे जगतधारिणे धीमहि ॥
तन्नो पित्रो प्रचोदयात् ॥
ॐ कुलदेवतायै नम: ॥ॐ पितृ देवतायै नम:॥
पितृ अमावस्या, महालय अमावस्या
अन् अर्थात् सर्वपितृ मोक्ष अमावस्या
अशा अनेक नावांनी ओळखली जाते,
आजची-महत्वाची सर्वपित्री अमावस्या…
पितृपक्षाचा आजचा हा अंतिम दिवस
पितरांना तर्पण करण्याचा-श्राद्ध-पक्ष…
संपूर्ण पंधरवड्यात केलेल्या प्रार्थनेची
सांगता करण्याचा हा आखिरी-दिवस…
आपल्या पूर्वजांचे पुण्यस्मरण करुन,
ऋण फेडण्याची ही एक नामी-संधी…
तेलाचा दिवा, पितृ-सूक्त मंत्र पठण,
पूजन आज विधी-पूर्वक संध्याकाळी…
पितृ प्रार्थना केल्याने अन्य सर्व बाधा,
संपूर्णत: दूर होऊन पितृदोष-निवारण…
आजी-माजी-आगामी सर्वच पिढ्यांना,
लाभे सर्वव्यापी पितरांचे शुभाशिर्वचन…
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply