🌷 कसे सांगावे शब्दांत सारे…


🌷 कसे सांगावे शब्दांत सारे...
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

कसे सांगावे शब्दांत सारे
आकाशात सर्व हसरे तारे…

आज चमकणेही विसरले
गतस्मृतींनी जणू त्यां घेरले…

वैराण-भावे विश्व व्यापले
भिंगरी समान सदैव फिरले…

शिंपल्यातले जीव भुकेले
घायाळ सारे आत कोंडले…

उगवला पूनवेचा चांदवा
उगा मनाला छंद जडला…

नभात चांदण्यांचा ताटवा
हवेत पसरे शितल गारवा…

मूक वेदनेचे पेटते निखारे
मना झोंबणारे वादळ वारे…

कसे सांगावे शब्दांत सारे
का गगन असे झाकोळले…

रमले क्षणभर ते विसावले
कसे सांगावे शब्दांत सारे…

मन माझे गुंतले-गुंतले असे
भोव-यात अडकूनी वेडेपिसे…

कसे सांगावे शब्दांत सारे,
हे कोडे कधी ना उकलणारे...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!