कविता:🌷”वास्तव्य-बाप्पांचे”

🌷वास्तव्य-बाप्पांचे...
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

सण म्हणजे प्रत्येक मना-मनातील आनंदोत्सव...
त्याकरिता कधीही न होऊ दे निसर्गाला ऊपद्रव...
म्हणून समस्त भक्तजनांना कोटी-कोटी आर्जव…
उधळपट्टी-दिखाव्याला न द्यावे महत्त्व अवास्तव

भक्त करती धावा," हे देवा, आम्हां पाव रे पाव ".
कुणीही ना विचारी,"बाप्पा, तुम्हां काय हवं राव "
आता बाप्पाच करताहेत विनवणी, भक्तजनांना...
"लक्ष द्या, छाटून टाका साऱ्या वायफळ गोष्टींना"...

टिळकांनी ज्या उदात्त हेतूने सुरु केली होती प्रथा...
पाहून सद्य-भ्रष्ट-स्वरूप लाज वाटेल त्यांना आता...
आप्त-स्वकीय-मित्रांसमवेत करूया "मानस-पूजा"...
विसरून अनावश्यक असा फुकटचाच गाजावाजा...

“नैसर्गिक गोष्टीच प्रिय-मजला, बेत असावा साधा”...
साजरा व्हावा सण असा चाखूया त्यातील खरी मजा...
खोट्याचा लवलेश नको, कृत्रिम-गोष्टींची मज बाधा...
नको तो बडेजाव, साधेपणातूनच अनुभवू “और मजा”..

छोटिशी अशी बाळ-स्वरूप-मूर्ती स्वत: हाताने बनवा...
तिलाच शेंदूर, हळद फासून, हिरवागार पाला लावा...
नैवेद्यासाठी दूध, दही, गूळ-खोबरे अथवा सुका-मेवा...
प्रसन्न होईल तेव्हा माझ्यासकट संपूर्ण-निसर्ग-देवता...

पूर्णपणे विसरून भक्तजनहो, पूर्वी जे-जे करत आले...
आजपासून निसर्ग-दत्त गोष्टींनीच, माझे पूजन करावे...
जिथे दोन हस्त-एक मस्तक असे भक्तिभावे झुकलेले,
त्या ठिकाणी माझे वास्तव्य असे शंभर टक्के ठरलेले...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!