कविता - 🌷" वास्तव्य-बाप्पांचे " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
सण म्हणजे प्रत्येक मना-मनातील आनंदोत्सव... त्याकरिता कधीही न होऊ दे निसर्गाला ऊपद्रव...
भक्त करी धावा," हे देवा आता तरी पाव रे पाव "... कुणीही ना विचारी,"बाप्पा, तुम्हां काय हवं राव " आता बाप्पाच करताहेत विनवणी, भक्तजनांना... "लक्ष द्या, छाटून टाका साऱ्या वायफळ गोष्टींना"...
टिळकांनी ज्या उदात्त हेतूने सुरु केली होती प्रथा... पाहून सद्य-भ्रष्ट-स्वरूप, लाज वाटेल त्यांना आता... आप्त स्वकीय मित्रांना जमवून बांधून"मानस-पूजा"... विसरून अनावश्यक असा फुकटचाच गाजावाजा...
नैसर्गिक गोष्टीच प्रिय-मजला, बेतही असावा साधा... साजरा व्हावा सण असा, आणि त्यातच खरी मजा... खोट्याचा लवलेश नको, कृत्रिमपणाची मला बाधा... नको बडेजाव, साधेपणातून अनुभवू एक और मजा...
छोटिशी अशी बाळ-स्वरूप-मूर्ती स्वयं हाताने बनवा... तिलाच शेंदूर, हळद वा वाटून हिरवागार पाला लावा... नैवेद्यासाठी दूध, दही, गूळ-खोबरे आणि सुका-मेवा... प्रसन्न होईल तेव्हा माझ्यासकट संपूर्ण-निसर्ग-देवता...
पूर्णपणे विसरून भक्तजनहो, पूर्वी जे-जे करत आले... आजपासून निसर्ग-दत्त गोष्टींनीच, माझे पूजन करावे... जिथे दोन हस्त-एक मस्तक असे भक्तिभावे झुकलेले, त्या ठिकाणी माझे"वास्तव्य"शंभर टक्के असे ठरलेले... तेथेच माझे "वास्तव्य" कायमस्वरूपी असते टिकलेले...
Leave a Reply