🌷ओंजळीतील पाकळ्या…

ओंजळीतील पाकळ्या...

🌷ओंजळीतील पाकळ्या...
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

ओंजळीतील पाकळ्यांचा,
स्पर्श वाटतो हवा-हवासा…

हुरहुरतो जीव वेडा-खुळा,
नवसंकेत देई तो चराचरा…

तुझ्या डोळ्यांतील चांदवा,
आज भासे मज नवा-नवा…

अवघ्या सृष्टीतील कोमलता,
तळव्यांत माझ्या सामावता…

सुगंध हलकाच दरवळला,
अंतरीची पाकळी उमलता…

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!