🌷आभाळ कवेत आले…


🌷आभाळ कवेत आले...
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

मनातल्या खोल खोल डोहामध्ये
अंधुकसे स्मित हास्य गुणगुणते...

कितीही जंग-जंग जरी पछाडले
अस्फुटसे प्रतिबिंब क्षणीं झळकते...

सावल्या विचारांच्या दर्या-किनारी
लांब-लांब-त्या पसरती फेसाळती...

ओल्या चांदण्याची किमया सारी
एक विलक्षण ओढ अन् शिरशिरी...

टिपूर चांदणं माळून मिटल्या डोळी
पूनव-पूर लेऊनी चंद्र-बिंब ते भाळी...

उतरत्या क्षितीजी ठेंगणे गगन झाले
भवसागरी असे आभाळ कवेत आले...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!