कविता:🌷”सिध्दिंचे-उगमस्थान”


कविता : 🌷 "सिध्दिंचे-उगमस्थान"
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी॥

आजचा हा नववा अवतार दुर्गा-देवीचा...
दुर्गेच्या-सर्व स्वरूपांच्या शक्ति-गुणांचा,
समावेश एकवटून जन्म झाला देवीचा...
उच्चस्वरात जयघोष सिद्धिदात्री देवीचा...

सिंह-वाहीनी, प्रसन्न-वदना असे देवी...
शुभ्र-वस्त्र प्रिय तिज, रूपाने तेजस्वी...
अष्टौ-सिद्धिंचे उगम-स्थानच आहे ती...
उपासनेने प्रसन्न होते सिद्धीदातीदेवी...

आरंभी आदि-पराशक्ति निराकार होती,
रुद्रानेच मनोभावे आराधना केली तिची...
अष्ट-सिद्धी प्रदान केल्या, देवीने रुद्रासी...
तेव्हा शिवाच्या डाव्या-अंगी प्रकटली ती...

सिद्धिदात्री देवी, सर्व-सिद्धिंचे उगम-शरिर...
प्रकटते डाविकडें शक्ति, उजवे शिव-शरीर...
त्यामुळे देवाधिदेव झाले"अर्ध-नारी-नटेश्वर"…
पृथ्वीवरी एका वेगळ्या अवतारातील ईश्वर...

सिद्धिदात्रीदेवी, असे कमळात विराजमान...
डाव्या हातात कमळ, शंख शोभिवंत छान...
हाती सुदर्शन, सर्व सिध्दिंचे ती उगम-स्थान...
वनराजावर आरुढ अष्टौ-सिध्दिंचे करी दान...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!