कविता:🌷”व्यक्ती तितक्या प्रवृत्ती”


कविता : 🌷 " व्यक्ती तितक्या प्रवृत्ती "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

वास्तविकत: माणूस एकटाच या जगात येतो,
अन् जसा आला, तसा एकटा निघूनही जातो ...

पण तरीही,

वस्तुतः तो आहे एक कळपाने राहणारा प्राणी ...
एरव्ही प्रत्येक जण मनाचा राजा अथवा राणी ...
रंग बंदलतो, जेव्हा जमती मित्र आणि मैत्रिणी ...
अन् गायला लागतात वेगळयाच रागात गाणी ...

एकतरी समान दुवा लागतो मैत्री सुरू होण्यास ...
आमच्यातील दुवा, अध्यात्म व त्याचा अभ्यास ...
भिन्न आवड-निवड असूनही दुराग्रह नसे खास ...
अध्यात्मिक बैठक उदात्त हेतूने प्रेरित हमखास...

कालची सायंकाळ मैत्रिणींना भेटण्याची होती ...
एक नुकती अमेरिका-वारी करुन आली होती,
दुसरी सुनेच्या बाळंतपणासाठी, जाणार होती ...
गप्पांमध्ये मैत्री कमी, अमेरिकाच अधिक होती ...

विचार आला, माणसं चुटकीत कशी रंग बदलती...
यापूर्वी यांना परदेश या विषयाचीच ऍलर्जी होती,
विषय निघाला तरी लगेच नाक मुरडून, नापसंती...
आता मात्र धबधब्यासम भरभरून बडबडत होती...

" ह्याला जीवन ऐसे नाव "...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!