कविता : 🌷 " रहाट-गाडगे "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
पाणी म्हणजेच जीवन, भरणे-रिक्त होणे...
चाले सातत्याने, कधीकधी होते जीवघेणे...
क्षणभंगुरता जीवनातली, कठीण उमजणे...
आयुष्य म्हणजे, जणू एक रहाट-गाडगे…
जीवनातील प्रत्यक्ष चढ-उतारच दर्शविते…
एकीकडे तुडुंब भरते, क्षणातच रिक्त होते...
एका बाजूने पाणी उपसले जात असते,
दुसऱ्या बाजूने घडे रिकामे करत असते...
सुख-दु:खाचे धडेच जणू शिकवत असते...
कधी अनंत-अदृष्य-हस्ते भर-भरून देते...
एखाद्या अभाग्याचे नशिबच फळफळते...
तर कधी होत्याचे पार नव्हते होऊ शकते…
कधी आनंदाची सुखदायी लहर पसरवते…
कधी-काळी दुःखाचे प्रचंड डोंगर उभारते…
मन-बुध्दि-शरिर सर्व मग, सुन्न-बोथट होते…
कधी मनामध्ये घन-दाट धुके-धुकेच पसरते…
अचानक सगळे कसे फिके-फिकेसे भासते...
बळे-बळे जगून, खोटे-खोटे हसणे फक्त उरते…
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply