कविता : 🌷 " नांदते भरभरून सुख "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्म्यै नमः:।। 🙏
ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ।।
ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि,
तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ॥
सर्वांना सदाच हवा सरस्वती व लक्ष्मीचा निवास...
बाल्य जातं शिक्षणात अन् आयुष्य-अर्थार्जनात...
ज्या घरी नांदते, विद्या-सुसंस्कार-माणुसकी प्रेम...
खात्रीने तेथे असेल सुख-समाधान-स्वास्थ्य-क्षेम...
प्रत्येक घरामध्ये असतोच श्री लक्ष्मीचा निवास...
तिचा वावर कायमच असतो, विविध स्वरुपात ...
लक्ष्मीच वसते, वात्सल्य-मूर्ती-आईच्या रुपात...
कुटुंबाला सावरणा-या, धर्मपत्नीच्या स्वरुपात...
घराघरात गोड लाडक्या-प्रिय लेकीच्या रुपात ...
तर कधी छोट्या-खट्याळ बहिणीच्या स्वरुपात ...
काही घरात, लाड-पुरवणा-या आजीच्या रुपात ...
तर घरातल्या चिमुरड्या-गोड-नातीच्या स्वरुपात ...
लक्ष्मीची ही सारी रूपं, जरी निरनिराळी असली,
तरीही श्री लक्ष्मीच वसत असते प्रत्येक रुपातही...
ज्या ज्या ठिकाणी, घरात स्त्रियांची होते जपवणूक
आपुलकीची-मानाची-आदराची, प्रेमळ वागवणूक...
जेथे प्रेमाने-सन्मानाने जपली जाते स्त्रित्वाची बूज...
त्या सर्व-घरा-घरात, हमखास नांदते भरभरून सुख...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply