कविता:🌷”कधी कधी मन”


कविता : 🌷 " कधी कधी मन "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

कधी कधी मन उगीचच हुरहूरते...
कापलेल्या पतंगासम भिरभिरते...

वा-यावरती स्वार होऊन लहरते...
सगळीकडे धुके-धुके जणू दाटते…

कधी विनाकारणच मन गहिवरते…
हळवे-वेडे मायेच्या ऊबेस बिलगते…

पावसाच्या सरींना न्याहाळत बसते...
थेंबा-थेंबाच्या नक्षी-कामातच रमते…

गुंग होऊन नकळत गुणगुणू लागते...
कधी आकाशीचे, तारे मोजत राहते…

कधी जलाशयी मनसोक्त-डुंबत-बसते
कधी फुलांत उगा-रूंजी-घालत-बसते...

कधी फेसाळ उंच लाटांवर झेप घेते...
कधी निरागस हास्यानंदाने सुखावते...

कधी बर्फाच्छादित शिखरी विसावते...
कधी मंदिराच्या घंटारवात विरघळते...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!