कविता:🌷”एकच-वसा”


कविता : 🌷 " एकच-वसा "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

‘घेऊ या एकच वसा, मराठीला बनवू या ज्ञानभाषा'
शिक्षणाची-श्रीमंतीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना

सर्वसामान्य कुटुंबात, खूप गरिबीत वाढलेला मुलगा
दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, उमद्या-स्वभावाचा

सर्वोच्च पुरस्कार, भारतीय सर्वोच्च पदी स्थानापन्न
ठाम मत, वाचनानेच माणसाचे जीवन समृद्ध-संपन्न

भारतरत्न-माजी राष्ट्रपती-शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम
त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला,विचारांच्या बैठकीला-सलाम

यशस्वी जीवनाचा पाया रचला, ज्ञान-ग्रहण-केल्याने
रोज एक पुस्तक वाचनात-मोठेपणाचे बीज दडलेले

त्यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने, जन्मदिनी
१५ ऑक्टोबर हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून, जयंती

वाचनामुळे, अनेक आयुष्यं जगण्याची सिध्दी प्राप्त
जीवनाचं-जगाचं भान येऊन अनुभव-विश्वही समृद्ध

सखोल दृष्टीकोन, समृद्ध-जाणीवा, चौकस ज्ञानबुद्धी
बदलत्या जगाबरोबर जगण्याचा वेग विस्तारण्यासाठी

वाचन-संस्कार रुजविण्यासाठी, जयंती होते साजरी
नित्य-नियमित-वाचन ही ज्ञानार्जनाची पहिली पायरी

वाचनाने शक्य होते व्यक्तीमत्व विकास-आत्मजागृती
आयुष्यात पुस्तकांसारखा प्रेरणादायी दुसरा गुरु नाही

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!