कविता :🌷”चैत्र-पालवी”


कविता : 🌷 " चैत्र-पालवी "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

बहरलेली ती चैत्र-पालवी...
जणू हात-पसरुनी बोलावी...
दरवळणारा मंद-मंद-सुगंध,
जणू आठवणींना कवेत घेई...

हृदयाच्या सात-कप्प्यात...
कोमल भावनांची कुपी...
रातराणी दरवळत राही,
गंध-वेड्या चांदण्या-राती...

वा-याचा दंगा, लाटां-संगती...
अवखळ सागरा येई भरती,
मन वेडे, फिरे अवतीभवती...
कळत-नकळत उमलते प्रिती...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!