कविता : 🌷” स्वप्नांत मी “


कविता : 🌷" स्वप्नांत मी "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

कधी कधी स्वप्नांच्या दुनियेत इतकी हरवून जाते,
सत्यातही कुठे-कुठे मग, स्वत:लाच शोधत बसते…

सागर-किनारी रेतीमधले सुवर्ण-कण वेचित बसते
माझ्या पाऊल-खुणांना, लाटांनी मीच पुसत असते...

सागरा, गेलास जरी विसरूनी तू सारीच मूक वचने
प्रत्येक आर्जवी-स्पंदन तुझे ते सदैव आठवत राहते...

हेमंत येतो, मोहोर गळून पडतो, नव-पालवी सुकते
तरी ग्रीष्मात वसंत-ऋतूची, चातकासम वाट पाहते...

सूर्यास्त होऊन जातो, हळू-हळू रात्रही पुढे सरकते...
भावूक वेडी-खुळी मी, नित-चंद्राला निरखत बसते...

🌷 तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!