कविता 🌷’ स्मृतींचं मोहोळ ‘




कविता 🌷’ स्मृतींचं मोहोळ ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख बुधवार, २३ ऑगस्ट २०२३
वेळ : संध्याकाळी, ५ वाजून ३३ मि.

माहेराची ओढ असे जगा-वेगळी
क्षणभरात खुलते मनाची गं कळी 
कशी गुंतवून ठेवू वेड्या मना बाई,
फिरफिरुनी जाई माहेरी वेळोवेळी

माहेरचा गं ध्यास मनासी लागता,
तहान-भूक लोपली बघता-बघता
झोप ही उडाली स्वप्न-रंजन करता
कशी बाई थोपवू या वेड्या चित्ता !

झुलतो हा मधुर स्मृतींचा हिंदोळा
आठवणींचा गोफ-माहेरचा लळा 
झर-झर पाझरत नेत्रांत जिव्हाळा
वेध गं माहेराचे-जीव आतुर खुळा 

माहेर म्हणजेच आठवांचा गहिवर
माहेर म्हणजे नात्यांचा हृद्य मोहोर
वात्सल्याचा स्पर्श-व-मायेचा पदर 
स्मृतींचं मोहोळ-दाटून येई गं अंतर !

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆










Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!