कविता : 🌷 ‘ सुखाला भरती ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : मंगळवार, २९ ऑगस्ट २०२३
वेळ : संध्याकाळी, ७ वाजून ४० मि.
हे गौरी-नंदना, हे देवा गणराया
कृपादृष्टी करण्या, बाप्पा सत्वर या
कृपावृष्टी करण्या, बाप्पा सत्वर या
वेदनेने प्राण, कंठाशी आले आता …
तुमच्या विना कोण, आहे आम्हां त्राता ?
तुमच्या विना बाप्पा, कोण आम्हां त्राता ?
आस लागली अंतरी, तुमच्या आगमनाची
वळवा हो दयाळू, कृपा-दृष्टी तुमची
वळवा हो वळवा, कृपा-दृष्टी तुमची
आम्हां सर्वां नादान, बालक समजून तरी …
रक्षण करा हो बाप्पा, सर्वतोपरी …
रक्षण करावं बाप्पा, सर्वतोपरी …
रात्रंदिन गाईन, देवा तुमचे गुण-गान …
सद्बुद्धी-सद्शक्तिचं, आम्हा द्यावं वरदान !
सद्बुद्धी-सद्शक्तिचं, आम्हां द्या वरदान !
भरकटलेल्या मनांना, द्यावी जागृती
इतुकीच कळकळीची, बाप्पा ही विनंती …
इतुकीच बाप्पा-चरणी, कळकळीची विनंती …
निरामय आनंदाची, सदा वृष्टी व्हावी …
सर्वांच्याच सुखाला, पूर्ण भरती यावी !
सगळ्यांच्या सुखाला, पूर्ण भरती यावी !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply