कविता – 🌷 ” सिकंदर – पौरस “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – १२ डिसेंबर २०१६
कधी शत्रूही जाऊ शकतो भारावून,
उच्च- तम जीवन- मूल्यांना पाहून …
रणयुद्ध थांबवून, अभय-दान देऊन
जन्म-भराच्या मैत्रीचं वरदान देऊन …
जग-ज्जेता व्हायचं एकमेव स्वप्नं …
उराशी आला होता तो कवटाळून …
सिकंदर सुसाट घुसला हिंदुस्तानात,
लढला संपूर्ण तयारी-निशी जोशात …
पौरस व अंभी हे शेजारच्या राज्यांचे राजे …
पण दोघांच्यामधून विस्तव सुद्धा जात नसे …
एक दक्षिण-धृव दुसरा उत्तर-धृव असे होते ते…
पौरसचं सरळ मन, अंभी भ्याड-मतलबी-धूर्त
पौरस सुसंस्कृत,अंभी संधी-साधून सोडी मुहूर्त …
हिंदुस्तानात घुसण्या आधी, खूप पूर्वी-पासून
हुशार, महत्वाकांक्षी सिकंदरने गृह-पाठ करुन
दोघांचेही स्वभाव-विशेष ठेवले होते तपासून …
आपसातल्या त्या दुष्मनीचा फायदा उचलून …
एकाचवेळी दोघांच्याकडे शांती प्रस्ताव पाठवला …
घाबरट, लालची अंभी त्याच्या जाळ्यात फसला …
त्यामुळं युद्ध-शांती-करार सिकंदर-अंभीत झाला
शूर-वीर पौरसने प्रस्ताव साफ शब्दात फेटाळला …
सिकंदर-पौरसचा जेव्हा झाला आमना-सामना,
सिकंदर मनी म्हणाला,”ये अलग मिट्टिसे है बना”
लोभी,स्वार्थान्ध-अंभीहून किती वेगळा आहे हा …
अंभी-सिकंदर युती होऊन, पौरसवर हल्ला केला
त्याला दोन्ही बाजूंनी घेरुनही निडर-पौरस लढला …
पौरसच्या शौर्याची शर्थ पाहून, तो चकितच झाला
स्वार्थी अंभीपेक्षा, पौरसच मैत्रीसाठी योग्य वाटला …
मनातून इतका हादरला की त्यानं पवित्राच बदलला …
हिंदुस्तानातून गाशा गुंडाळून आला तसा मागे फिरला …
भारतीय-संस्कृती-मुल्यांनी, सिकंदर प्रभावित झाला …
पौरसच्या रुपात तर त्याला एक नवा दोस्तच मिळाला …
दोन भिन्न व्यक्तिंमध्ये हवा किमान एकतरी समान धागा …
जो महान कट्टर-शत्रूंमध्येही निर्माण करतो घनिष्ठ मित्रता …!
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply