कविता – 🌷 ‘ साक्ष ‘ तारिख – २७ जानेवारी २०२४


कविता – 🌷 ‘ साक्ष ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – २७ जानेवारी २०२४
वेळ – ११ वाजून ५५ मि.

श्रीनटवर निरंजन नंदलाल हा नटला …
थेट हृदयीच, लबाड जाऊनी बसला …

सिंहासनस्थ श्रीरंग नाद-निनाद करी …
अष्टौ-सिद्धी वीणा-वादने, साथ करी …

ओठी वेणू विराजित, स्वर-झंकार करी …
मंत्रमुग्ध होत गोधेनु, दुग्ध-पान्हा सोडी …

गोप-गोपी घडे घेऊन जाती यमुनातीरी …
रम्य-सांजवेळ-अवतरले सांजरंग भूवरी …

हिरव्या-वनांतरी घन-दाट हिरवी झाडी …
राधासवे कान्हा, अलगद खोड्या काढी …

नभी टिपूर चांदणं, चंद्रही चम-चम करत …
झुळुझुळु वाही यमुना-जळ मूक साक्ष देत …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆 


































Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!