
कविता : 🌷 " सांज-रंग "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
दुपार सरता उन्हं येती मावळतीला
पक्षांचा थवा आकाशातून विहरला...
पश्चिमेला खुळ्या अंबराने, झुकावे...
लज्जित दिशेने, सांज-रंग उधळावे...
घुंगरांच्या तालावर, गायींनी परतावे
भुकेल्या पाडसाला पाहूनी, हंबरावे...
आभाळात रंग-पंचमी, कान्हा खेळे
रजनीनाथ उगवता संगे अंबर उजळे ...
पान्हा पाझरताच, वासराने बिलगावे
मातृत्वाचे तृप्त अश्रूं नेत्रात चमकावे...
आयुष्याच्या या तृप्त अशा संधीकाली...
मनी गही-या सांज-रंगांची, गर्दी झाली...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply