कविता – 🌷 ” सदा अर्जुन बनून “…
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – शनिवार, १५ जूलै २०१७
निर्भेळ आनंदच आनंद, सर्वत्र आता वाटा …
त्याच आनंदाच्या लहरी दश-दिशांनी येता …
बनूनी अपार, अगणित अथांग अनंत लाटा …
तेव्हा निखळ स्वानंदाला सांगा काय हो तोटा …
गोष्ट जरी साधी-सरळ-अदृष्य वाटाही फुटती …
घनदाट धुक्यामधूनी सुध्दा, अफाट प्रयत्नांती …
घट्ट बंद मुठीतून निसटून, रेतीला मिळते रेती …
सुंदर-कमलिनीच्या गोड-मिठीतील तो भ्रमर …
सुखावून, हसतच पचवून टाकी मृत्युचे जहर …
बेधुंद होऊनी, देहभान विसरूनी, सर्व प्रहर …
जणू काळ मातला, चंद्र हसला, झाला कहर !
सुखासीन, क्षण-भंगुर असे तन-मन-जीवन …
क्षणिक सुखाच्या मृगजळापाठी, जाई धावून …
सत्-संगतीने सत्कारणी लागता, परिसा-सम
निखरते जसे, जणू झळकणारा सुवर्ण-कण …
जणू यंत्रातील झर-झर झरणार्या रेती-समान,
आयुष्याचा क्षणन्-क्षण पळे, बिजली-समान …
प्रत्येकाने जागरूक होऊन, शोधता सत्कारण
आयुष्य किंचितही वाया न जाई, विना-कारण …
लक्ष्यावर केंद्रित करून आणि अचूक नेम धरुन,
जीवनाचे-अचूक ध्येय साधावे, सदा अर्जुन बनून …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply