दुर्गा-देवी जेव्हा संपूर्णतः झाली तेजांकीत, तिच्या सुहास्य-वदनाने, विश्वं झाले निर्मित त्याआधी पूर्ण-जग बुडलेलं, घोर अंधारात कुष्मांडा-विश्वनिर्माती-आदिशक्ति म्हणतात
आदिशक्तिच्या अद्वितीय प्रखर तेजामुळं, दुष्टांचा अंत, नष्ट होती, पापांची पाळंमुळं कष्ट-बाधांचा अंत, दु:ख-क्लेश-नष्ट समूळं भक्तांचे रक्षण, संकटे दूर पळतील सकंळं
देवीची सुवर्ण-कांती तेजानं झळाळणारी सु-हास्यातून बिजली-समान तळपणारी देवीची आभा, सूर्यापरी प्रकाश फेकणारी अंडाकृती ब्रह्मांडाची स्वनिर्मिती करणारी
म्हणून तिचे नाव पडले, " कुष्मांडा देवी " आठापैकी पाच, अस्त्र-शस्त्र घेऊन हाती अष्टौसिद्धी-दाती जपमाळ असे एक हाती, कमंडलू व कमलपुष्प धरिले एकेका हाती
भक्तिपूर्ण-भावाने देवीची केली पूजा-आरती, लाभे दिर्घायु, प्रकृती-स्वास्थ्य, नाम, कीर्ती ज्ञानोदय, शक्ति-सद्-बुद्धि-अज्ञानाची क्षिति म्हणून योगी, "कुष्मांडा-स्वरूपास" पूजती
देवीच्या कृपेने मनातील मळभ नाहीसे होते अंतर्मन-प्रकाशमान अन् निराशा पळून जाते सूक्ष्म-ब्रह्मान्डी अंतर्बाह्य समतोल शक्य होते माणसाला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सोडविते
Leave a Reply