कविता 🌷 ‘ बाप्पा बाप्पा ‘

कविता 🌷 ‘ बाप्पा बाप्पा ‘

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : मंगळवार, १९ सप्टेंबर २०२३
वेळ : ११ वाजून ३३ मि.

बाप्पा बाप्पा या हो या
सोंड इकडे वळवा जरा 
गा-हाणी सारी हो ऐका
दुष्ट-वृत्ती संपवून टाका || ध्रु ||

पूर्वी चुका झाल्या हातून
पश्चात्तापानं दग्ध होऊन
आता करु द्या परिमार्जन
सारा -हास-त्रास थांबवा || १ ||

साध्या सरळ रेषेत जीवन
तुम्हीच देता सर्वां संजीवन
सुख-शांतीचं होऊन मिलन
नांदू द्या प्रसन्नता घरा-दारा || २ ||

हेवेदावे संपून, व्हावी मित्रता 
मी-तूपण संपून शुद्ध पवित्रता
सद्-शक्ती सद्-विद्येची पात्रता
अलौकिक आनंद द्या घरा-घरा || ३ ||

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

































Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!