कविता : 🌷’ प्रेरणा ‘
कवयित्री तिलोत्तमा विजय लेले
तारिख : बुधवार, ८ मार्च २०२३
वेळ : १२ वाजून ३० मि.
जगभरात स्त्रीला समान-वेतन, मतदान-हक्क नव्हता मिळाला…
8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमधे स्त्री-कामगारांनी मोर्चा काढला,
त्यास्मरणार्थ हा`जागतिक-महिला-दिन’ म्हणून स्वीकारला गेला…
जागतिक स्तरावर स्त्री-हक्कांसाठी हा दिवस साजरा केला गेला…
स्त्रियांसाठी हा दिवस सन्मानाचा, अभिमानाचा तसेच आनंदाचा…
डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, अंतराळवीरा होऊन, गाजविण्याचा…
सावित्रीबाई फुले, डॉ.आनंदीबाई जोशी आदि सर्वांना स्मरण्याचा…
त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन, स्वकर्तृत्वाने जीवन सफल करण्याचा !
युगा-युगात पुरुषांनी स्त्रीला कायम दुय्यम स्थानी मानले
वर-वरच्या मान-सन्मानाखाली सर्रास कैक अन्याय केले !
कुशाग्र बुद्धीच्या चाणक्यांनी, स्त्रीचे सुप्त-गुण होते हेरले…
स्त्री-प्रगती हीच समाज-प्रगती हे चाणक्य नीतीत कथिले !
स्त्रीविना कुटुंब पूर्ण होत नाही, सुदृढ कुटुंबांशिवाय समाज नाही…
संयम, धैर्य, जिज्ञासा-अखंड प्रेमाचा व प्रेरणेचा स्त्रोत असते स्त्री,
सुशिक्षित, कर्तबगार, हुशार स्त्रीमुळे कुटुंबाचं कल्याण होते नेहमी…
भावी पिढ्या-ओघाने पूर्ण समाज-उन्नतीसाठी ठाम उभी असे स्त्री !
प्रत्येक स्त्रीने संधी मिळता, पूर्ण झोकून देऊन संधीचं सोनंच केलं…
आपापल्या क्षेत्रात अग्रेसर राहूनही, कौटुंबिक-कर्तव्यही निभावलं…
राणी लक्ष्मीबाईंनी दत्तक मुलास पोटाशी बांधून रणांगण गाजवलं !
जिजाऊंच्या प्रेरणेने, शिवरायांनी मराठ्यांचं नव-साम्राज्य उभारलं !
प्रत्येक स्त्रीला मातेसमान मानतो, तो जिजाऊंचा शिवबा असतो !
योगबळाने पाठीवर मांडे करु देतो, तो मुक्ताईंचा ज्ञानदेव असतो…
सखीला जीवाभावाची सदैव साथ देतो, तो राधेचा श्याम असतो…
लीलया शिवधनुष्याची प्रत्यंचा ओढतो, तो सीतापति राम असतो !
प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीशी किमान एक स्त्रीच असते !
कठीण प्रसंगी निडरपणे सामोरी जाऊन, त्याची ढालही होते !
मायेने लालन-पालन करुन-मनोबल वाढवून, ध्येयही बिंबवते !
बालपणीच सुसंस्कारांसह स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देते !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply