कविता – 🌷 ” प्रीतीचा फुलला पिसारा “


कविता - 🌷 " प्रीतीचा फुलला पिसारा "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

निसर्गरम्य अभूतपूर्व,
अमृत-कुंभ कलंडला...
गवसणी क्षितिजाला,
रजनीनाथ नभी उगवला...

श्वास रोधून बरसण्या आधी,
पापण्यांची तोरणं उभी...
मधुर झंकारांची किमया
अवघी रोमांचित काया ...

अलगद पहाट झाली,
चांदण्यात कुजबुज झाली...
ता-यांची तारांबळ उडाली,
सागराला भरती आली...

उजळून आसमंत सारा,
आभाळात रंगांचा-सडा...
लुकलुकणारा शुक्रतारा,
प्रीतीचा फुलला पिसारा...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!