कविता – 🌷 “निरागस-जीव, इवले-इवले” तारिख – १८ में २०१७

कविता – 🌷 “निरागस-जीव, इवले-इवले”
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले 
तारिख – गुरुवार, १८ मे २०१७ 

वाढदिवसाचा तो पूर्ण दिवसच अमितने,
व्यवस्थित आखणी करून, सुंदररितीने …
साग्रसंगीत साजरा केला होता हिरीरीने …

फारसा गवगवा नाही, उगीचचं स्तोमही नाही …

एक अत्याधुनिक छानसा फोन 
त्याने तिला आधीपासून देऊन,
तिच्या आवडीचे खास हेडफोन्स 
असं बरंचसं काही आणलं होतं …

अलास्का-टूरसाठी जास्त ऊबदार, 
खास बनावटीच्या थर्मल्सची भैट,
ही तर अफलातून कल्पना त्याचीच …
सरते शेवटी, रेड-वाईनची बॉटल
तोहफेपर “तोहफा” चौफेर भडीमार …

अख्खा दिवसच भुर्रकन् उडून गेला …
तिकडे राहूलने “संपूर्ण वॉर्डरोब नवा,
एकही ड्रेस चालणार नाही जुन्यातला” …
असं निक्षून सांगितलेलं होतं तिला …
“मदर्स डे”ला, लेकरांच्या प्रेमामुळे 
तिला अतिशय भरून आलं होतं 
तिचं अंतर-मन नितांत सुखावलं …
आई होण्यातलं खरं सुख गवसलं …

नऊ महिने ओटीपोटी, असलेले,
दोन निरागस-जीव, इवले-इवले …
कधी एव्हढे मोठे, जाणते झाले,
तिला बिल्कुल नाही कधी कळले …

🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉️🔆
















Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!