कविता : 🌷’ निखळ-आनंद ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख : शुक्रवार, ८ मार्च २०२४
वेळ : १२ वाजून २६ मि.
कधी कधी माणसं पूर्णतः गुरफटून जातात …
नकळत विणून-जाळ्यात स्वतः अडकतात …
मग कसलं भान रहात नाही म्हणून उगीचच
आकांडतांडव करुन भांडतात विनाकारणच
अशा वेळी भोवताली निसर्गाच्या सान्निध्यात
वेळ घालवणं जरुरी निरागस निस्वार्थीपणात
तना-मनाला तजेला देणारं अपार सृष्टी-सौंदर्य
निसर्ग-देवतेचं अलगद जादू करणारं, औदार्य …
शांत मनास तेव्हा जाणवेल ऋण जन्मदात्यांचं …
तळहाती झेलून पुरवलेल्या त्या लाडा-कोडाचं …
जाणीव होईल नव्याने, स्वतःच्या सद् भाग्याची …
जीव ओवाळून टाकणा-या बहिणीची-भावाची …
प्रचंड-कठीण-न सुटणारे सर्व समस्या अन् प्रश्न …
सविस्तर रेतीत लिहून-जपता’कृष्ण-कृष्ण कृष्ण’ …
मनातील तणाव-चिंता-प्रश्न यांचा, नाहक कचरा …
तो भगवंत लाटांच्या रुपात, करतो त्यांचा निचरा …
ताण-रहित तन-मन, पिसा-समान हलक-फुलकं
वा-यावर होऊन स्वार विसरे सर्व क्लेश व दु:ख …
पहिल्या पावसानंतर जसा आसमंत होतो स्वच्छ …
जळमटं जळून अंतर्मन होई शांत-तटस्थ-निरिच्छ …
वादविवाद-वादळी-वादग्रस्त वातावरणच बदलतं …
मन अनोख्या विशुद्ध-निखळ-आनंदात रमून जातं !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply