कविता – 🌷 ” नानाविध सुमने “


कविता - 🌷 " नानाविध सुमने "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

"व्यक्ति तितक्या प्रकृती" असं म्हणतात 
रंग-छटांची सुगंधी उधळण फुलं करतात
अन् मानवी जीवन सुंदर-समृद्ध करतात

झेंडू ...

सुगंधं बेतास-बात पण रंग नजर-फोड ...
घनदाट पाकळ्यांची रचना, दिसे-बेजोड
प्रवेश-द्वारी-तोरणामध्ये यांस नाही तोड

शोभे अंब्याच्या-हिरव्या-डहाळी-बरोबर
नेहेमीच होतो यांचा अधिकाधिक वापर ...
सुंदर सुशोभित करण्यात घरं व मंदिरं...

अबोली ...

मनमोहक रंग, सुरेख इवलंसं नाजूकसं...
फुल सुवासिक नसूनही, आवडेल असं...
घोस-भरभरून फुलं, बहर पानापानांत...

लांब-लचक गजरे वेण्यांत वापरलं जातं ...
दक्षिण-भारतीय, स्त्री-शृंगारात-आढळतं
लांब-लचक-केशरचनेमध्ये नजरेत भरतं...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!