कविता : 🌷 " तल्लफ "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
व्यक्ती तितक्या प्रकृती असतात
कुणी-कुणी चहाचे दर्दी असतात
तर कुणी कॉफीचे भक्त असतात
आवडत्या वाफाळलेल्या पेयावीण
या रसिकांची सकाळ ही नाही होत
जांभया देत रोबो-सम उगा भरकटणं
खेळण्यांना जशी चावी द्यावी लागते
तशी या महाशयांस हवी चहा-कॉफी
एकदा का "काठोकाठ भरली टाकी,"
की मग कामाचा वेग पाचपट होतो
तना-मनावरील मरगळ पळ काढून
एकूणच अंगामध्ये उत्साह संचारतो
बाहेर पावसाची रिमझिम असताना
गरमागरम आल्याचा मसाला चहा
खमंग कांदा भजी किंवा बटाटावडा
कॉफीचा मामला थोडा राजेशाही
तिला व्यवस्थित साथ-संगत हवी
तेव्हा मात्र तिची रंगत दसपट होई
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆
Leave a Reply