कविता -🌷 “ज्ञात” मधून”अज्ञात”कडे झेप. तारिख – ११ ऑक्टोबर २०१६

कविता -🌷 “ज्ञात” मधून”अज्ञात”कडे झेप

कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – ११ ऑक्टोबर २०१६

नवरात्रीचं अत्यंत शुभ असं पर्व …
दहाव्या दिवशी विजयश्रीचं पर्व …
भारतीय संस्कृतिचा सार्थ गर्व …
प्राचीन वेदांचं-ज्ञान सांगे अथर्व …

विजयादशमी म्हणजे दहाव्या दिवशीचा विजय
रामे रावणाचा वध केला, लंकेचा दारुण पराजय 
नऊ रात्रींच्या घोर युद्धानंतर दुर्गादेवींचा दिग्विजय
पांडवांचा अज्ञातवास संपुन त्यांच्या हक्कांचा जय

दशानन रावण युद्ध हरला म्हणून ” दश-हरा” …
दहाव्या दिवशी वध केला देवीनं महिषासुरा
“विजयादशमी”स विजयाचा-जल्लोष सुरवरा …
“आयुध-पूजा” करून वापरले शस्त्रा-अस्त्रा

पांडव लढले शमीच्या झाडावरून आयुधं काढून
सारे हक्क त्यांचे परत मिळवले दिग्विजयी होऊन 
जीवनातिल सर्व क्लेशांचे, कष्टांचे, पापांचे दहन …
राम-लीलेत श्रीरामांनी केले रावणाचे गर्व-हरण …

असत्यावर सत्याचा विजय …पांडवांनी कौरवांचा पराजय …
नऊ स्वरूपातील देवींचा जय-रामाचा लंकेशावर दिग्विजय …

खलं-प्रवृत्तींचा समूळ संहार 
शौर्याचा-विरतेचा जयजयकार …
नऊ दिवसाच्या उपवासा नंतर,
मिष्टान्न मेजवानीचा उपहार …

दसरा हा भक्ति-समर्पणाचा सण 
अंतर्गत सर्व असुरी-शक्तिंचं मरण …
सृजनशील वृत्तींना शुभ निमंत्रण …
उत्साही,आनंदी जल्लोश सर्वजण …

श्रद्धा-भक्ति-उल्हास यांचा त्रिवेणी-संगम …
अध्यात्मिक प्रगतीमधे आश्चर्यजनक जम …

वासनांपासून कायम मुक्ति
विविध सिद्धिंची दैवी शक्ति
सरस्वती-पूजन विद्या-भक्ति
आयुधं वृक्षी लपवीणं-युक्ति …

नव-रात्रींच्या तपश्चर्येनं पुण्य जमतं …
सत्याचा उदय व त्रिकाल-ज्ञान होतं …

साधकाच्या मनातील पाप नष्ट होते …
अध्यात्मिक-ज्ञान प्रगती दृश्य होते
“ज्ञात” मधून”अज्ञात”कडे झेप जाते

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉🌷☘

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!