कविता : 🌷 " उसने "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
अमुकतमुक आपलं आहे, आपण सर्रास म्हणतो
अन् मनोमनी योजनांचा डोलाराच आखत बसतो...
पण प्रत्यक्षात "आपलं असं" खरोखर काय आहे?
जन्माला आलो म्हणून जगावर हक्क सांगू लागतो...
आपल्या आधी अन् नंतरही ते तसेच राहणार आहे
आपल्या असण्याने वा नसण्याने, ते बदलणार आहे?
बंगला-गाड्या-पैसाअडका-स्थावर-जंगम-मालमत्ता...
कितीही कवटाळून बसलो तरी कोणाची खरी सत्ता ?
आपण राहीलो म्हणून ते घर, ती वास्तू आपली होते ?
रक्त, मांस, हाडं यांनी बनलेली कुडी, आपली असते ?
इतकंच नव्हे तर मोजूनमापून आणलेले "श्वास"आपले ?
जे जगण्यासाठी धडपडतो, ते"आयुष्याचे लेणे"आपले ?
मालकी हक्क गाजवावा असं खरोखर काय आहे नेमके ?
घर-नाती-शरिर-आयुष्य अन् श्वासही, सर्वच आहे "उसने"...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply