कविता : 🌷 ‘ उर्जेचा झंकार ‘

तारिख -रविवार, १५ जानेवारी २०१७
कवितेचं नाव- 🌷” उर्जेचा झंकार “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले

जणू रवि-तेजाचा-पुतळा,अशा स्वामींचं,
स्कॉट-लँड-नॅशनल पार्कला भाषण होतं …
अपेक्षेप्रमाणे, जमली होती, अफाट-लोकं …
भाषण छान रंगलं,सर्व लोकांनी नावाजलं …

भाषणात,विश्वाचं रूप बदलवण्यास,२०जणं,
आवश्यक आहेत,असं त्यांनी होतं, सांगितलं,
टाळ्यांचा गजर,स्टँडिंग-ओवेशनही मिळालं
पण वीस जणांपैकी एकही पुढे नव्हतं आलं,

पहाटे, स्वामी विवेकानंदांच्या दरवाजातच,
एकविदेशी तरुणी उभीच होती कुडकुडंत …
विचारपूस करून,येण्याचं कारण विचारलं,
क्रिस- नोबल नामक युवती, प्रेरित होऊन,

ती म्हणाली,” स्वामी, तुमच्या भाषणानंतर,
मी ठरवलंय, बाकीच्या १९ चं नाही माहीत,
पण तुमच्या कामात,माझं जीवंन, समर्पित “…
असा जबरदस्त प्रभाव होता स्वामींचा,सर्वत्र

एकदा,योकोहामा ते शिकागोच्या प्रवासात,
स्वामींचा,जमशेटजी टाटांशी झाला परिचय,
त्याची परीणती म्हणजे, आयआयटीचा, जन्म
आणि टाटा-रिसर्च-युनिव्हर्सिटीचा झाला,उगम 

टाटांची इच्छा,स्वामींनीच मुख्य-पदं, भूषवावं
स्वामींनी,साधनेत विघ्न नको,म्हणून नाकारलं
त्यांच्या अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात,
प्रचंड वांग्मय-रूपातल्या खजिन्याची ठेव …
भक्ति-योग, ज्ञान-योग,राज-योग,कर्म-योग …
अद्वैत-आश्रम,” माय-मास्टर “आदि लेखन …

असे महान,होते स्वामी विवेकानंद …
ज्यांच्याविषयी मनात फक्त गर्वच…
ज्यांनी शिकवला,जगण्याचा आनंद …

ध्येयाचा आनंद – जीवनाचा आनंद …
कामातील आनंद-सद्-विचारांतला आनंद …
अशी महान व्यक्ति, हजारो वर्षात एकदा,
जन्म घेते,उद्धार करण्या,मनुष्य-जातीचा …

शत-शत,कोटी-कोटी प्रणाम …
त्यांच्या अति-उच्च कार्यास,
त्यांच्या लेखन- वांग्मयास …
त्यांच्या महान व्यक्तिमत्वास …
त्यांच्या आध्यात्मिक वाटचालीस …

वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षीच,
महा-समाधी घेतली,बेलूर-मठला …
त्याआधी रामकृष्ण-मठाची स्थापना केली
ठिकठिकाणी स्थापना,रामकृष्ण-मिशनची,

स्थूलार्थांनं महा-मानवं, सूक्ष्मात विलीन झाला …
पूर्ण जगाच्या मना-मनात कायम कोरला गेला …
हे कवन करताना, प्रत्यक्ष आलेला,सत्यानुभव …

या युग-पुरुषाचं नुसतं नाव घेण्यानं,
त्यांच्या एखाद्या शब्दानं वा वाक्यानं,
त्यांच्या प्रेरणा- दायी व्यक्तिमत्वांनं,

संपूर्ण तन- मनात,अति-सूक्ष्म लहरींचं स्पंदन
ब्रह्मारंध्रा पासून, तरल- तम- कंपनांचा संचार
तळ-पायापर्यंत, पराकोटीच्या ऊर्जेचा झंकार …
कितीही लिहूनही,वाटे लेखनाची आस अजून …

त्यांच्या अत्यंत स्फूर्तिदायी,विचारांविषयीची
माहिती, तपशीलवार घेऊया,पुढील भागान्ती …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!