कविता – 🌷 ” अतृप्त-इच्छांची-पूर्ती “

कविता - 🌷 " अतृप्त-इच्छांची-पूर्ती "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया ।
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी ।।

दैत्य-अत्याचारांनी प्रजा फार त्रासून गेली होती
तारकासुरानें तिन्ही लोकी त्राही माजविली होती
देव-दानव संग्रामात, स्कंद-बाळ होता सेनापती
स्कंदमातारूपात स्कंदासह देवीची रणी नियुक्ति

स्कंदबाळ मांडीवर, माता सिंहावर आरूढ झाली
चार भुजा-त्रिनेत्र-सोन्यापरी तेजाने झळके कांती
स्कंद-माता-देवी, हिमालयाची-सुपुत्री, ओजस्वी
मातेसह, शूरवीर स्कंद-बाळ रणी लढले सर्वस्वी

सेनापती-स्कंदाच्या शौर्यामुळे, सर्व स्तंभित होती
अथी-रथी-महारथी सगळेच तोंडात बोटं घालती
मुरुगन-स्कंदाने लीलया वध केला तारकासुराचा
मातेसह-स्कंदाने पराजित केले पूर्ण दानवसेनेला

नाश केला घोर अन्यायाचा, दुष्ट-पापी-दानवांचा
देवादिकांनी जयजयकार केला विजयी, स्कंदाचा
स्कंद-माता धन्य झाली, निजपुत्राचे कौतुक होता
तिन्ही-लोक निश्चिन्त झाले तारकासूर-वध होता

स्कंदमातेच्या आशिर्वादे, जणू मोक्षाचे द्वार उघडे
प्रचंड-दैवीशक्तिच, भक्तांचा पूर्ण योग-क्षेम वाहे
उपासकांच्या सर्व अतृप्त इच्छांची पूर्ण-पूर्ती होते
अत्यानंदाची मानसिक-स्थिती कायम टिकून राहते

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏 🕉 🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!