कविता – बालगीत 🌷 ‘ जमली जोडी ‘. तारिख – रविवार, ३१ डिसेंबर २०२३

कविता – बालगीत 🌷 ‘ मस्त जोडी जमली ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – रविवार, ३१ डिसेंबर २०२३
वेळ – दुपारी ३ वाजून ४० मि.नव

आकाशात, ढग झाले गोळा …
मुलांना म्हणाले, “या-नाचा-खेळा”…
एकजात सगळी मुलं झाली गोळा …
त्यांना खूप खूप खूप, आनंद झाला …

एवढ्यात, वीज लागली चमकायला …
म्हणाली, “मुलांनो, लागलीच पळा …
“आता म्हातारी लागलीय् दळायला” …
“म्हणून गाशा गुंडाळा अन् घरी पळा” …

“शिवाय पाऊस घातलाय् यायला …
“धो-धो कोसळून, चिंब भिजवायला”
“पावसात भिजून सर्दी-पडसं-होईल”
“त्यामुळेच कदाचित शिक्षाही होईल”…
वीजेच्या आवाजाने, मुलं घाबरली …
गाल फुगवून, मग घरातच बसली …
आजी म्हणाली, “चला रे चला”, 
पहिल्या पावसात, मस्त भिजायला” …

हे ऐकून अर्जुनची, खुलली कळी …
पावसात भिजायला, मज्जाच आली …
चिंब चिंब भिजायची, गंमतच न्यारी …
अर्जुन-आजीची, मस्त जोडी जमली …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆







































































Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!